दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा
दिव्यांगाचा उद्धार हाच , दिव्यांग उद्योग समूहाचा आधार
आम्ही केलेल्या कामाचा लेखा - जोखा
ग्रामीण आणि शहरी भागातील दिव्यांग नागरिकाचे जनजीवन पाहून व्यथा जाणून घेऊन स्वतः दिव्यांग असणारे श्री.तानाजी दत्तात्रय घोडके सर यांनी ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दिव्यांग उद्योग समुह,महाराष्ट्र राज्य या सामाजिक दिव्यांग संघटनेची स्थापना सन २०१९ मध्ये केली आणि दिव्यांग सेवेला सुरवात केली .
प्रथम शिवश्री रामभाऊ पवार साहेब यांच्या सोबत राहून कठीण आणि महाभयंकर आशा कोरोना काळात दिव्यांग बांधवाना एक मदतीचा हात देत कामाला सुरवात केली या काळात अनेक दिव्यांग सहकारी सोबत घेऊन कामकाज केले. यामध्ये मा.पवार साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना अन्न धान्य कीट वितरण केले . तसेच विविध शासकीय कार्यालय व देवस्थान यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींना घरपोच अन्न धान्य पुरविण्याचे काम श्री.तानाजी घोडके यांनी केले .
दिव्यांग व्यक्तींना तहसील कार्यालय येथून आर्थिक सहाय्य व पगारी मंजूर करून देण्यात आल्या .
परंडा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबीराचे आयोजन केले.
दिव्यांग व्यक्तींना समाजकल्याण विभाग शेस खाते अंतर्गत विविध योजना लाभ देण्यात आला.यामध्ये मतीमंद , अतितीव्र यांना प्रत्येकी २५०००/- याप्रमाणे लाभ देण्यात आला.
नगपालिका परंडा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ९ लाख रुपये वितरण करण्यास भाग पाडले व दिव्यांग निधी वितरीत केला.
परंडा तालूक्याती ग्रामपंचायत मार्फत दिला जाणारा ५% निधी ग्रामसेवक /सरपंच यांना निवेदने देऊन देण्यास भाग पाडले.
दिव्यांग व्यक्ती / महिला / पुरुष याच्यावरील अन्यायाबाबत आवाज उठवला.
दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग अन्तोदय रेशन कार्ड मिळवून दिले.
दिव्यांग व्यक्तींना खरकुल योजना देण्यास भाग पाडले व मिळवून दिले
श्री.तानाजी दत्तात्रय घोडके
संस्थापक/अध्यक्ष : दिव्यांग उद्योग समूह
कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य