“दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा.”

जो शरीर से दिव्यांग होते है, वो विचारों से विकलांग नही होते है. कोशिश करने से वो हर मुश्किल और असम्भव कार्य कर लेते है.

“इंसान की शक्ति उसकी आत्मा में होती है और आत्मा कभी विकलांग नही होता है.”

दिव्यांगाचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा आधार

दिव्यांग उद्योग समुह (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र्रातील दिव्यांग बांधव व नागरिकांना आव्हान करण्यात येते कि आपल्या दिव्यांग समूहामध्ये सभागी व्हावे.श्री तानाजी घोडके

दिव्यांग नागरिकासाठी प्रत्येक तालुक्यात प्रमाणपत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
ना.डॉ.तानाजी सावंत साहेब यांना निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके व पदाधिकारी…

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगासाठी विविध योजना

समाजातील दुर्बल व दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात असलेल्या योजना, शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग कर्ज योजना, मोफत कृत्रिम साहित्य साधने, दिव्यांग राज्य शासन पुरस्कृत योजना, दिव्यांग पेन्शन योजना, ग्राम पंचायत दिव्यांग योजना, ..

पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के निधीतून कोणकोणत्या योजना हाती घेण्यात याव्यात, याबाबतचे सर्व अधिकार संबंधित जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत यांना देण्यात येत आहे.

दिव्यांग नागरिकासाठी विविध कृतीम साहित्य वाटप

उस्मानाबाद (भूम परंडा वाशी )तालुक्यातील दिव्यांग बांधवाना समाजकल्याण विभाग उस्मानाबाद व एल्मिको कंपनी मार्फत विविध अवयव व साहित्य वाटप करण्यात आले.

दिव्यांग प्रमाणपत्र (युडीआयडी ) कार्ड साठी अर्ज भरा.

दिव्यांग व्यक्तींना केंद्र शासनाचे नवीन युडीआयडी कार्ड देण्यात आलेले आहे , त्यानुसार सर्वाना लाभ देण्यात येतो यासाठी हे कार्ड सर्व दिव्यांग नागरिकांनी काढून घ्यावे.

दिव्यांगाना पिवळी (अंत्योदय) रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवाना अंत्योदय रेशन कार्ड जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबर २०२२ रोजी वाटप करताना राज्य अध्यक्ष तानाजी घोडके व पदाधिकारी..