आत्‍मकथनात्‍मक
“माझे कथन सुरू करण्यापूर्वी प्रथम मी सर्व अधिकाऱ्यांचे व मित्राचे आभार मानतो. कारण त्यांनीच मला तुम्हा सर्वांसमोर उभं राहण्याची ही संधी दिली आहे. मी आता ‘उभं राहण्याची’ असा उल्लेख केला, पण तो वास्तव आहे ; कारण मी आता तुमच्याशी बोलत आहे ते बसूनच. कारण मी कधीच सर्वसामान्य माणसासारखा चालू शकलो नाही. त्याचं कारण म्हणजे मी जन्मतः अपंग आहे. तुम्हा सर्वांसारखा मी स्वतःच्या पायांवर उभा राहिलो राहत आहे.“मीवर्षाचा झालो. तेव्हाच माझ्या आईच्या हे लक्षात आलं. ती माऊली निश्चित हबकली असणार, पण माझी आई मोठी धीराची होती आणि आईमुळेच मी आज तुमच्यासमोर निराळ्या अर्थाने उभा आहे. अपंग असूनही स्वावलंबी आहे. मला उभं राहता येत पण एका पायाने अपंग आहे हे लक्षात आल्यावर आईवडिलांनी सर्व उपाय योजिले. डॉक्टरी इलाजांबरोबर इतरही सर्व उपाय योजिले गेले. पण मी सर्व सामन्या माणसासारखे राहू शकणार नाही असं निश्चित झाल्यावर माझ्या आईने मला वेगळ्या अर्थाने उभे केले.“माझे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा देऊळगाव येथे गावातच झाले. माझ्यासाठी चाके लावलेला एक सायकल तयार करण्यात आली. या सायकलवर बसून मी सर्वत्र हिंडत असे. इतर मुले धावाधावी, छपाछपी खेळत ते पाहून माझ्या या अवस्थेबद्दल मला वाईट वाटे. पण ही उणीव माझी आई भरून काढीत असे. ती माझ्याशी त-हेतहेचे खेळ खेळत असे. कथा, कविता व इतर माहिती सांगत असे. आज माझ्या लक्षात येते की, त्यावेळी आईने मला ज्या कथा सांगितल्या त्या सर्व कथा संकटांवर मात करणाऱ्या शूरांच्या असत. त्यांतील सूर्यसारथी अरुणाची कथा मला अधिक जवळची वाटे. त्या कथांनी माझे मन उभारले गेले. आपल्यातील उणिवेची मला कधी खंत वाटली नाही. आपण आपल्या व्यंगावर मात केली पाहिजे असे वाटू लागले.“घरी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबांनी माझ्यासाठी सायकलवरून शाळेत जाण्याची व्यवस्था केली. त्यात बसून मी शाळेत जाऊ लागलो. आणि खरं सांगतो, तेथे मला एक विलक्षण आनंद गवसला. सायकालवर बसून प्रवास करताना अनेक अडचणी येत. पण माझे दोस्त, भाऊ, चुलत बहिण,भाऊ यांनी मला मदत करीत. शाळेत ते जेव्हा कोणताही खेळ खेळत तेव्हा मी पंचाचे काम करीत असे; आणि त्यांच्याइतकाच खेळाचा आनंद लुटत असे. माझ्या अपंगत्वाचा त्यांनी कधीच उपहास केला नाही. मला आठवतं, एकदा शाळेत एका मुलानं माझा उल्लेख ‘पांगळा’ असा केला, तर माझ्या एका मित्राने त्याच्या खाडकन मुस्कटात दिली. एकंदरीत दोस्तांच्या बाबतीत तर मी अतिशय भाग्यवान ठरलो आहे. आपण केलेल्या चुकीची भरपाई करण्यासाठी परमेश्वराने मला बुद्धिमत्ता बरी दिली असावी म्हणूनच की काय शालेय व महाविदयालयीन शिक्षण मी विशेष गुणवत्ता मिळवून पार पाडू शकलो.आई बाबांची इच्छा माझा मुलगा शिक्षक व्हावा, आणि चागली नौकरी मिळावी यासाठी पुणे ता मावळ या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण घेतले.“डी.टी.एड. झाल्यावर मी स्वतःचा छोटासा संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र टाकले . त्यावेळी अनेकांचे मदतीचे हात मला मिळाले. आज माझे हे D.i.i.T कॉम्पुटर सेंटर & टायपिंग इन्स्टिट्यूट परंडा तालुक्यात नावारूपाला आले आहे ; त्याचे कारण हे सारे सहकाऱ्यांचे हात! माझ्या सेंटरमध्ये मी नेहमी गरीब होतकरू , दिव्यांग यांची नेमणूक करतो. माझ्या आई-वडिलांनी जे रोपटं माझ्या मनात फुलविलं तेच इतरांच्या मनांत फुलविण्याचा मी प्रयत्न करतो. त्यासाठीच हा मुलाखतीचा प्रपंच. माझ्या दोस्तांनो, तुमच्यातील उणीव विसरून जा. तिचे भांडवल करू नका. प्रयत्नाच्या मार्गावर तुम्ही धावू लागा आणि मग तुम्हांला आढळेल की, असे कितीतरी जण तुमच्याबरोबर धावत आहेत.” अशा या कठीण काळातून प्रवास करत आज दिव्यांगाच्य सेवेसाठी तालुक्यात काम करत आहे.त्यात आपल्या सर्वाची साथ मला मिळत आहे त्यातून एक नवीन उर्जा घेऊन दररोज एका तेजस्वी सूर्यप्रकाशाप्रमाणे जीवन जगत आहे, व जीवनाचा असा हा प्रवास सुरु आहे.